

IIM Pune Declared Best Training Centre as CRPF Defuses 767 IEDs
sakal
पुणे: देशात मोठी जीवितहानी घडवून आणण्याच्या देशविघातक शक्तींचे मनसुबे उधळून लावत, केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) २०२५ या वर्षात तब्बल सहा हजार ५१० किलो स्फोटके आणि ७६७ ‘आयईडी’ (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) जप्त करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे देशावरील मोठे संकट टळले असून, अनेकांचे प्राण वाचले आहेत. या यशामागे सुरक्षा दलांना ‘आयईडी’ निकामी करण्याचे अद्ययावत प्रशिक्षण देणाऱ्या पुण्यातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ आयईडी मॅनेजमेंट’ (आयआयएम) या संस्थेचे मोलाचे योगदान आहे.