
National Defense Academy Passing Out Parade : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षक प्रबोधिनी म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकादमीनं इतिहास घडवला आहे. कारण आज इतिहासात पहिल्यांदाच महिला कॅडेडची तुकडी सैन्यात रुजू होणार आहे. त्यांचा आज दीक्षांत संचालन म्हणजेच पासिंग आउट परेडचा सोहळा पार पडला. एनडीएतून भारतीय सैन्य दलात रुजू होणारी ही १४८वी तुकडी असणार आहे. यामध्ये एकूण १७ मुलींचा समावेश आहे.