
Pune Grand Challenge
Sakal
पुणे : ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. या स्पर्धेला युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (यूसीआय) या आंतरराष्ट्रीय सायकलिंग संघटनेने त्यांच्या पुढील वर्षाच्या दिनदर्शिकेत समाविष्ट केले आहे. भारतात अशा प्रकारच्या स्पर्धेला पहिल्यांदाच असा मान मिळाला आहे.