

Swift Investigation and Speedy Trial Lead to Landmark Judgment in Nasrapur Case
esakal
पुणे : नसरापूर प्रकरणात न्यायालयात केवळ १६ दिवसांत ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पोलिस आणि सरकारी पक्षाने मांडलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल दिला. विशेष म्हणजे या खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयाने उन्हाळी सुटी रद्द करून दररोज कामकाज चालवले, अशी माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर आणि पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.