

Lakhs of Ambedkarite followers line up late into the night to pay tribute at the historic Vijay Stambh at Perne Phata.
Sakal
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा जवळ पेरणे फाटा (ता. हवेली) येथे २०८व्या शौर्यदिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी हाती निळे झेंडे व मुखी ‘जय भीम’ची गर्जना करीत लाखो आंबेडकरी अनुयायांचा जनसागर उसळला. उत्साहपूर्ण वातावरणाने संपूर्ण विजयस्तंभ परिसर व अहिल्यानगर रस्ता गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत अभिवादनासाठी अखंड रांगा लागल्या होत्या.