Koregaon Bhima News : विजयस्तंभ अभिवादनासाठी जनसागर

शौर्यदिनानिमित्त भीम अनुयायांसह विविध मान्यवरांची गर्दी
Koregaon Bhima Vijaystambh
Koregaon Bhima Vijaystambhsakal
Updated on

कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमानजीक पेरणेफाटा (ता. हवेली) येथे २०७ व्या शौर्यदिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांचा जनसागर लोटला होता. हाती निळ्या ध्वजांसह ‘जय भीम’च्या घोषणा देत लोटलेल्या लाखो अनुयायांच्या गर्दीने पुणे-अहिल्यानगर रस्ता अक्षरश: फुलून गेला होता. दरम्यान, आज दिवसभर विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी भीम अनुयायांसह अनेक मान्यवरांनीही मोठी गर्दी केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com