Chawant Fort : चावंड गडावर आढळल्या ऐतिहासिक वस्तू

पुष्करणी गाळमुक्त करताना सापडली तोफ, तोफगोळा, बंदुकीचे बॅरल.
Historical objects found at Chawand Fort
Historical objects found at Chawand Fortsakal

जुन्नर - ऐतिहासिक चावंड ऊर्फ प्रसन्नगड (ता. जुन्नर) येथे दुर्ग संवर्धन मोहिमेत ‘मरहट्टे सह्याद्री’चे या दुर्ग संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांना एक महाकाय तोफ व तोफगोळा, तसेच ब्रिटिशकालीन बंदुकीचे बॅरल सदृश पाइप व लाकडी अवशेष मिळून आल्याचे संस्थेचे अमोल ढोबळे यांनी सांगितले.

शिवाजी ट्रेल संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने चावंड येथे दुर्ग संवर्धन मोहीम राबविण्यात येत आहे.

चावंड येथील ऐतिहासिक पुष्करणी गाळमुक्त करण्याचे काम करत असताना पुष्करणीमध्ये या पुरातन वस्तू मिळून आल्या. त्या जुन्नर वनविभागाकडे सुपूर्त केल्या.

या वेळी मनोज सावंत, सतीश देसाई, दशरथ साबळे, कमलाकर साबळे, दिगंबर साबळे, संपत भालचीम, अविनाश शेळकांदे, विश्वास साबळे, दुर्गोत्सव टीमचे ओमकार ढाके, उज्ज्वला सावंत, सिद्धेश कवडे, अनिरुद्ध हांडे आदी उपस्थित होते.

जानेवारी महिन्यांपासून पुष्करणी गाळमुक्त करण्याच्या उपक्रम हाती घेण्यात आला असून, रविवारी (ता. ९) मरहट्टे सह्याद्री व दुर्गोत्सवचे एकूण ३० सदस्य या कामासाठी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संवर्धनाच्या कार्यास सुरूवात केली. इतिहासाचे अभ्यासक विनायक खोत यांनी ‘शिवराज्याभिषेक’ या विषयावर दुर्ग संवर्धकाना मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com