बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याची इतिहासाला दखल घ्यावी लागेल | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याची इतिहासाला दखल घ्यावी लागेल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश उगवत्या पिढीच्या प्रत्येक तरुणाच्या हृदय आणि अंत:करणापर्यंत नेण्याचे कार्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. त्यांच्या कार्याची इतिहासाला दखल घ्यावी लागेल. तसेच, त्यांचा मार्ग पत्करून त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी केले.

हेही वाचा: महापालिकांच्या समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड

हिंदू जनजागृती समिती आयोजित 'वारसा शिवशाहिराचा, जागर हिंदुत्वाचा' या ‘ऑनलाइन’ संवादात ते बोलत होते. भिडे म्हणाले, ‘‘ शिवशाहीर बाबासाहेब हिंदुस्तान आणि हिंदू समाजासाठी जगले. आपला देश, संस्कृती, परंपरा जपत स्वाभिमानपूर्वक राष्ट्र म्हणून उभे राहण्यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेला शिवचरित्राचा ग्रंथ उपयोगी पडणारा आहे. या ग्रंथाचे पारायण करून कृती करावी.’’

इतिहासप्रेमी मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष मोहन शेटे यांनी शिवशाहिरांच्या आठवणींना उजाळा दिला. वीररत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभु देशपांडे स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष कौस्तुभ देशपांडे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट आदी या वेळी उपस्थित होते.

loading image
go to top