महात्मा गांधींच्या हळव्या आठवणी (व्हिडिओ) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

61590092_663952557362879_55.jpg

पुणे : महात्मा गांधी म्हणजेच बापू एका छोट्या मुळाशी खेळत आहेत, असं दर्शवणारा पुतळा आपलं लक्ष वेधून घेतो. बापूंच्या जीवनातील काही हळव्या आठवणींच्या साक्षीदार असलेल्या काही वस्तू इथं सांभाळून ठेवलेल्या आहेत.

महात्मा गांधींच्या हळव्या आठवणी (व्हिडिओ)

sakal_logo
By
नीला शर्मा

पुणे : महात्मा गांधी म्हणजेच बापू एका छोट्या मुळाशी खेळत आहेत, असं दर्शवणारा पुतळा आपलं लक्ष वेधून घेतो. बापूंच्या जीवनातील काही हळव्या आठवणींच्या साक्षीदार असलेल्या काही वस्तू इथं सांभाळून ठेवलेल्या आहेत.

राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणजेच बापूंच्या अनेक हळव्या आठवणी आगाखान पॅलेसमध्ये जपलेल्या पहायला मिळतात. भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महात्मा गांधींनी दिलेल्या लढ्याबद्दल शिक्षा म्हणून बापूंना इथं ठेवण्यात आलं होतं. इथंच कस्तुरबांचं आणि महादेवभाईंचं निधन झालं. त्या दोघांची समाधी व बापूंचा अस्थिकलश येथे आहे. कस्तुरबांनी शेवटच्या काळातल्या आजारपणात वापरलेली गादी, उशी व इतर वस्तू इथं अशा तऱ्हेनं रचून ठेवलेल्या आहेत की, जणू नुकत्याच कस्तुरबा इथून दूर गेल्यासारखं वाटतं. 

सरोजिनी नायडूंना इथं ज्या खोलीत  ठेवण्यात  आलं होतं, तिथं त्यांचं छायाचित्र लावलेलं आहे. त्या हसऱ्या चेहऱ्यावर त्यांचा आत्मविश्वास, निर्धारही स्पष्ट जाणवतो. ही सगळी मंडळी एकत्र येऊन जेवायला बसायची ते टेबल पहायला मिळतं. बापूंचे कपडे, चपला व आणखी काही वस्तू बघता येतात. त्यांना भेट दिले गेलेले लवंग व वेलदोड्याचे हार पाहून गंमत वाटते. सत्य, अहिंसा व स्वावलंबन या बापूंनी आचरणात आणलेल्या तत्त्वांचं दर्शन चित्रं व छायाचित्रांमधून घडतं. 

भव्य पॅलेसच्या सभोवती जोपासलेली भलीमोठी बाग मनाचा मोकळेपणाचं महत्त्व जणू सांगते. इटली, फ्रांस आदि देशांमधील स्थापत्यशैली वापरून केलेलं बांधकाम नजर खिळवून ठेवतं.  

loading image
go to top