खरा इतिहास कादंबरीपेक्षा वेगळा असतो - रंगनाथ पठारे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

पुणे - ‘‘ऐतिहासिक कादंबरी लिहिताना कल्पनेचे पंख लावले जातात. पंख जरूर लावावेत; पण फार मोठी भरारी घेऊ नये. त्यामुळे पुढे गोंधळ निर्माण होऊ शकतो,’’ असे मत पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले. हाच धागा पकडून ‘‘खरा इतिहास कादंबरीपेक्षा वेगळा असतो. याचे भान वाचकांनी ठेवणे गरजेचे आहे,’’ असे साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी स्पष्टपणे सांगितले.

राजहंस प्रकाशनाच्या समारंभात वसंत वसंत लिमयेलिखित ‘विश्‍वस्त’ कादंबरीचे प्रकाशन पठारे आणि डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते झाले.

त्यांच्यासह दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, लेखक संजय भास्कर जोशी यांच्याशी अभिनेते किशोर कदम यांनी साधलेला मनमोकळा संवाद, अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी केलेले अभिवाचन आणि कवी संदीप खरे यांचे काव्यवाचन व अभिवाचन... अशा अनोख्या रंगमंचीय आविष्कारामुळे हा प्रकाशन सोहळा रंगला.

डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘‘विश्‍वस्त या कादंबरीत आजवर न हाताळले गेलेले अनेक विषय पाहायला मिळतात. विशेषत: पुरातत्त्वशास्त्र, लिपीशास्त्र, इतिहासाची वर्णने दिसतात. वेगवेगळ्या कारणांनी ही कादंबरी वाचकांना गुंतवून टाकते; पण ऐतिहासिक कादंबऱ्यांतील सर्वच प्रसंग खरे, असे अनेकांना वाटते. बरेच विद्यार्थी कादंबऱ्यांचा अभ्यास करून पेपर सोडवितात, हे चुकीचे आहे.’’ 

पठारे म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या विषयांचा शोध घेऊन, त्यांचा अभ्यास करून मराठीत फारसे लिहिले जात नाही. ही गरज ‘विश्‍वस्त’ या कादंबरीने भरून काढली आहे.’’

मराठी वाचक कमी झाला आहे, असे म्हटले जाते, ते चुकीचे आहे. वाचक कमी झाला नसून, तो म्हातारा झाला आहे. नव्या पिढीतील वाचक मराठी साहित्याकडे वळू नयेत, अशीच व्यवस्था आपल्या आजूबाजूला निर्माण झाली आहे.
- रंगनाथ पठारे, साहित्यिक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: History is very different than the novel