

पुणे - देशात एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले असल्याने पुणे महापालिका सतर्क झाली आहे. पण लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरु केलेली नाही. यावर महापालिका प्रशासनाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आल्याशिवाय महापालिकेला विमानतळावर तपासणी करता येत नाही असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले आहे.