Pune Hoarding : फांद्या तोडून महापालिकेच्या दारात उभा राहतय होर्डिंग

पुणे शहरात झाडे तोडून उभ्या केल्या जाणाऱ्या होर्डिंगची परवानगी रद्द करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वीच दिले आहेत.
Hoarding to pune municipal corporation
Hoarding to pune municipal corporationsakal

पुणे - शहरात झाडे तोडून उभ्या केल्या जाणाऱ्या होर्डिंगची परवानगी रद्द करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वीच दिले आहेत. मात्र, आता महापालिकेच्या दारातच भर रस्त्यात पीएमपीला होर्डिंग उभे करण्याची परवानगी आकाश चिन्ह विभागाने दिली आहे. धक्कादायक म्हणजे यासाठी झाडाच्या अनेक फांद्याही तोडण्यात आलेल्या आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर मात्र, सारवासारव करत ही परवानगी रद्द केली जाईल असे सांगितले.

शहरातील धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. त्यामध्ये अधिकृत होर्डिंगच्या सांगड्यात विना परवानगी बदल केला असेल, झाडे तोडून होर्डिंग उभारले असेल अशांवर देखील कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अनेक होर्डिंगवर कारवाईची टांगती तलवार आहे.

एकीकडे होर्डिंगवर कारवाई करा असे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले देत असताना दुसरीकडे महापालिकेच्या नव्या इमारतीच्या दारातच भलेमोठे होर्डिंग उभारण्यास आकाशचिन्ह विभागाने पीएमपीला परवानगी दिली आहे. यासाठी शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने फांद्या तोडण्यास परवानगी दिली आहे.

आकाशचिन्ह परवाना नियमावलीचे उल्लंघन

राज्य सरकारने २०२२ मध्ये आकाशचिन्ह विभागासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये पदपथावर आणि सार्वजनिक रस्त्यावर कोणताही जाहिरात फलक लावता येणार नाही. जेथे पदपथ नसले तेथेही सार्वजनिक रस्त्यावर जाहिरात फलक लावता येणार नाही अशी तरतूद केलेली आहे. त्यामुळे या नियमाचे उल्लंघन करून पीएमपीला होर्डिंग उभा करण्याची परवानगी दिली आहे.

रोज हजारो नागरिकांची वर्दळ

महापालिका पीएमपी बस थांब्यावर रोज हजारो प्रवासी येतात. ज्या ठिकाणी होर्डिंग उभे केले जात आहे तेथेच रांगेत अनेक जण बसची वाट पाहत उभे असतात. तरीही नागरिकांच्या सुरक्षेचा विचार न करता महापालिकेने थेट परवानगी दिली आहे. शिवाय या होर्डिंगमुळे महापालिकेची इमारत झाकली जाणार असून, विद्रुपीकरणात भर पडणार आहे. तरीही मुख्य खात्याने ही परवानगी कशी काय दिली? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘या ठिकाणी पीएमपीला होर्डिंग उभे करण्यासाठी परवानगी दिली आहे. परवानगी रद्द केली जाईल.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com