Holiday Journey : सुट्टीच्या काळात फिरायला जातंय; तर मग हे वाचाच!

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगच्या कामास मुहूर्त मिळत नव्हता. आता एप्रिलच्या अखेरीस रिमॉडेलिंगच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता अधिक आहे.
Pune-Railway-Station
Pune-Railway-Stationsakal
Summary

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगच्या कामास मुहूर्त मिळत नव्हता. आता एप्रिलच्या अखेरीस रिमॉडेलिंगच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता अधिक आहे.

पुणे - पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगचे काम एप्रिल महिन्याच्या अखेरीस सुरू होत आहे. हे काम सुमारे २८८ दिवस चालणार आहे. ऐन उन्हाळाच्या सुट्टीत या कामास सुरुवात होत असल्याने सुट्टीचा बेत आखून परगावी फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. ब्लॉकच्या काळात पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार असून यात गाड्या रद्द करणे, मार्ग बदलणे, प्रवासाचे स्टेशन बदलणे, आदींचा समावेश असणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगच्या कामास मुहूर्त मिळत नव्हता. आता एप्रिलच्या अखेरीस रिमॉडेलिंगच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता अधिक आहे. रेल्वे प्रशासन त्या दृष्टीने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. हडपसर व शिवाजीनगर स्थानकावरून रेल्वे गाड्या सुरू करणे हा त्याचाच एक भाग आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाच्यावतीने हे काम केले जाणार आहे. डीआरएम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एप्रिल अखेरपासून काम सुरू केले जाणार असल्याचे सांगितले आहे.

Pune-Railway-Station
Pune News : औंध आयटीआयमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण

‘ब्लॉक’चा कालावधी कमी होणे गरजेचे

यार्ड रिमॉडेलिंग कालावधी तब्बल २८८ दिवसांचा आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हा कालावधी कमी होणे गरजेचे आहे. डीआरएम इंदूराणी दुबे हे स्वतः ब्लॉकचा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, अद्याप तरी त्यांच्या प्रयत्नाला यश आलेले नाही. या काळात रेल्वे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडणार आहे. मात्र, ऐन सुट्टीत रेल्वे गाड्या रद्द होतील. त्याचा मोठा फटका प्रवाशांना व रेल्वेला बसणार आहे. मात्र, हे काम होणे हे देखील गरजेचे आहे.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस यार्ड रिमॉडेलिंगच्या कामास सुरुवात होईल. हे काम सुमारे २८८ दिवस चालेल. ब्लॉकचा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या कामामुळे प्रवाशांची गैरसोय होईल. मात्र, हे काम होणेदेखील आवश्यक आहे.

- इंदूराणी दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

Pune-Railway-Station
Pension : निवृत्तिवेतनासंबंधी नवी पद्धत हाताळताना अनेक अडचणी

पुणे स्थानकाचे यार्ड रिमॉडेलिंग दृष्टिक्षेपात...

  • २०१६-१७ मध्ये मिळाली मंजुरी

  • ५२ कोटींचा खर्च अपेक्षित

  • यंदाच्या अर्थसंकल्पात ३१ कोटींचा निधी मंजूर

  • २६ आठवडे चालणार काम

पुणे स्थानकाची सद्यःस्थिती...

  • दररोज प्रवास सुरू होणाऱ्या गाड्या : ७२

  • १८ डबे असलेल्या गाड्या : ४२

  • दररोज धावणाऱ्या गाड्या : २५०

  • दररोजची प्रवासी संख्या : १ लाख ५० हजार

  • एकूण फलाट : ६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com