पुणे विद्यापीठ करतेय तब्बल 'एवढ्या' विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठी नियोजन

Pune University is planning for the exams of two and a half lakh students
Pune University is planning for the exams of two and a half lakh students
Updated on

पुणे : 'कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. तरीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सुमारे १५० प्रकारच्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी २ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांचे नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार केला जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे आणि राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने पुणे विद्यापीठामार्फत तयार करण्यात येणाऱ्या कृती आराखड्यान्वये पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठामार्फत जाहीर केले जाणार आहे. त्याचे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा - पुण्यात परप्रांतीय मजुरांकडे दुर्लक्ष का?

पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर, नाशिक या तीन जिल्ह्यात घ्यावयाच्या परीक्षाबाबत सविस्तर कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचे यापूर्वीच कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले आहे. परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करण्यासाठी कृती आराखडा तयार झाल्यावर महाविद्यालयांसाठी परीपत्रक, परीक्षांचे वेळापत्रक, आसन व्यवस्था आणि विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे जाहीर केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. तसेच परीक्षा कशा घ्याव्यात, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कसे बोलवावे, प्रश्नपत्रिका तयार करणे याच्यासाठी विद्यापीठाचे अधिष्ठाता, महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्याबैठका सुरू आहेत.

आणखी वाचा - पुण्यात कोथरूड संदर्भात महापौर मोहोळ यांचा मोठा खुलासा

इतर विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, २ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी विज्ञान, तंत्रज्ञान विभागाचे आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी विषय ही जास्त असल्याने परीक्षेसाठी अचूक नियोजन करण्यात येत आहे, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला मिळणार 'एवढी' रक्कम!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Government Begins Survey of Pre 2011 Government Land Encroachments in Mumbai and Pune for Regularisation
Malin Village Landslide Anniversary 12 Years Since 151 Lives Were Lost in Devastating Pune District Disaster
narayangaon police arrested baliram jalindar tambe beed accused for stealing farmer tractor from pargaon tarfe ale junnar cctv investigation
malthan shirur pune family assault after children dispute sc st atrocity act case prem bhaskar sonawane santosh gurav sachin gurav ravindra bhosale shirur police
Marathi News Esakal
www.esakal.com