लॉकडाउनबाबत अजितदादांच्या बारामतीकरांचे आहे हे मत

मिलिंद संगई
सोमवार, 13 जुलै 2020

बारामती शहरातील कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने बारामतीकरांनी काळजी घेण्याची गरज प्रशासनाच्या वतीने व्यक्त होत आहे.

बारामती (पुणे) : बारामती शहरातील कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने बारामतीकरांनी काळजी घेण्याची गरज प्रशासनाच्या वतीने व्यक्त होत आहे. आजमितीस एकट्या बारामतीत तब्बल 721 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दरम्यान, संसर्गाचा धोका अधिक असल्याने पूर्ण लॉकडाउन करावे, असा अनेकांचा आग्रह असला, तरी लॉकडाउन हा काही यावरचा उपाय नाही, असाही मतप्रवाह अनेकांचा आहे. 

आणखी वाचा - इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, तिघांना अटक 

बारामतीत काल एकाच दिवशी 18 रुग्ण सापडले. बारामतीच्या दृष्टीने कोरोना रुग्ण सापडण्याचा हा विक्रमच होता. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले असल्याने झपाट्याने अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समूह संसर्गाचा धोका निर्माण होण्याची भीती आता नागरिकांना सतावू लागली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दुसरीकडे प्रशासनाने आता व्हेंटीलेटर्सच्या सुविधा असलेले रुग्णालय ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. शहरात लोक गर्दी करत असल्याने संसर्गाचा धोका अधिक असल्याने पूर्ण लॉकडाउन करावे, असा अनेकांचा आग्रह असला, तरी लॉकडाउन हा काही यावरचा उपाय नाही, असाही मतप्रवाह अनेकांचा आहे. 

बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढायला लागली असल्याने आता नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी, मास्कचा वापर करायलाच हवा, वारंवार हात धुण्यासह सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायला हवे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. 
 
Edited by : Nilesh Shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home quarantined 721 people in Baramati city