पुणे शहरात घरांच्या विक्रीत ५४ टक्‍क्‍यांनी वाढ

Home Saling
Home Saling

पुणे - घरांच्या विक्रीत मुद्रांक शुल्कात घट झाल्यानंतर चौथ्या तिमाहीत (ऑक्‍टोबर ते डिसेंबर) शहरातील घरांची विक्री वार्षिक पातळीवर ५४ टक्‍क्‍यांनी वाढून ११ हजार ९५२ युनिट्‌सवर गेली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला गेल्या वर्षातील शेवटचे तीन महिने काहीसे दिलासा देणारे ठरल्याचे स्पष्ट होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘नाइट फ्रॅंक इंडिया’ने अर्धवार्षिक अहवालाच्या १४ व्या आवृत्तीचे (इंडिया रिअल इस्टेट- एच२ २०२०) अनावरण बुधवारी केले आहे. त्यात जुलै ते डिसेंबर या कालावधीत आठ मोठ्या शहरांमध्ये निवासी आणि कार्यालयीन बाजारपेठांच्या निर्मिती व विक्रीचे विश्‍लेषण करण्यात आले आहे. दुसऱ्या सहामाहीत शहरातील १७ लाख चौरस फूट जागा कार्यालयीन भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. नवीन कार्यालयीन जागा पूर्ण होण्याची प्रक्रिया याच कालावधीत पाच लाख चौरस फूट आहे. खराडी, फुरसुंगी, वानवडी आणि कल्याणीनगर, येरवडा, नगररोड, हडपसर या भागांमध्ये वार्षिक पातळीवर ३७५ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्य सरकारने सप्टेंबरपासून सात महिन्यांसाठी मुद्रांक शुल्क दरात घट जाहीर केल्यामुळे त्याचा अपेक्षित परिणाम झाला असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

शहरातील बांधकाम क्षेत्रातील स्थिती  

  • मजुरांच्या कमतरतेमुळे कार्यालये पूर्ण होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम
  • को-वर्किंग स्पेसची मागणी वाढली 
  • सरासरी भाडे वार्षिक पातळीवर ५.५ टक्‍क्‍यांनी कमी झाले
  • घरांची विक्री नऊ टक्‍क्‍यांनी वाढली आहे 
  • नवीन प्रकल्पांत घरांचे सरासरी आकारमान शहर वगळता सर्व लघु बाजारपेठांमध्ये वाढले 

पुण्यातील बांधकाम व्यवसायाची स्थिती ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात चांगली सुधारली आहे. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत आयटी क्षेत्रातून एकूण मागणी ही गेल्या महिन्यापासून कार्यालय मनुष्यबळाच्या क्षमतेवर असलेल्या मर्यादेमुळे कमी झाली होती.
- परमवीरसिंग पॉल, शाखा संचालक, नाइट फ्रॅंक इंडिया, पुणे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com