बेघर, भिक्षेकरी यांना मोबाईल फोन, आधार कार्ड नसले तरी देणार लस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Labour

बेघर, भिक्षेकरी यांना मोबाईल फोन, आधार कार्ड नसले तरी देणार लस

पुणे - आधार कार्ड (Aadhar Card) नाही किंवा कोणतेही शासकीय ओळखपत्र (Identity Card) नाही, अशा शहरातील भिक्षेकरी, भटके, फिरते विक्रेते आदी घटकांसाठी महापालिकेने लसीकरणाची (Vaccination) मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी महापालिकेच्या समाज विकास विभागातील समूह संघटिका आता पुढे सरसावल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून या घटकांची नोंदणी करून त्यांना लस देण्यास शहरात प्रारंभ झाला आहे. (Homeless Beggars Vaccinated do not Mobile Phone or Aadhar Card)

राज्यात दिव्यांग, तृतीयपंथीयांचे लसीकरण सुरू आहे. मात्र ‘सुपरस्प्रेडर’ भिक्षेकरी, फिरते विक्रेते, भटके आदी घटकांचे लसीकरण राहिले होते. त्यांच्याकडून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. हे महापालिकेने लक्षात घेऊन त्यांच्यासाठी लसीकरण सुरू केले आहे. त्यासाठी महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत शहरातील फुटपाथवर राहणाऱ्या व भिक्षेकरी यांची माहिती समूह संघटिका शहराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन गोळा करत आहेत. गोळा झालेली माहिती क्षेत्रिय कार्यालयांत एकत्रित करून संबंधित घटकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी काही सामाजिक संस्था, संघटनांचीही मदत घेण्यात येत आहे. या घटकांकडे आधार कार्ड व कोणत्याही प्रकारचे मोबाईल नाहीत, त्यांच्यासाठी ‘की फॅसिलेटर’अंतर्गत लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा: लोणावळ्यातील डॉ. खंडेलवाल यांच्या घरावरील दरोड्याचा अखेर उलगडा झाला

फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांच्या लसीकरणासाठी महापालिका काही सामाजिक संस्थांना सोबत घेऊन आम्ही शहराच्या वेगवेगळ्या भागात कॅम्प आयोजित करीत आहोत. ज्यांच्याकडे आधार कार्ड, मोबाईल नाहीत त्यांच्या लसीकरणासाठी आम्ही की फॅसिलेटर हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

- सूर्यकांत देवकर, आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

यांचे लसीकरण करणे का गरजेचे आहे ?

  • शहरातील मुख्य बाजारपेठेत वावर असतो.

  • सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागतो.

  • वेळेत लसीकरण पार पडले नाही तर ते तिसऱ्या लाटेत सुपर स्प्रेडर ठरू शकतात.

यांच्या लसीकरण मध्ये येणाऱ्या अडचणी ?

  • कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नाही

  • लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी मोबाईल क्रमांक नाही.

  • या घटकांना एकत्र करणे फार अडचणीचे आहे.

  • लसीकरणाबाबत कोणत्याही प्रकारची जागरूकता नाही.

गेल्या काही दिवसांत उपलब्ध झालेली माहिती

  • ११२३ फुटपाथवर झोपणाऱ्या नागरिकांची संख्या

  • २५० झालेले लसीकरण

Web Title: Homeless Beggars Vaccinated Do Not Mobile Phone Or Aadhar Card

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top