esakal | लोणावळ्यातील डॉ. खंडेलवाल यांच्या घरावरील दरोड्याचा अखेर उलगडा झाला
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

लोणावळ्यातील डॉ. खंडेलवाल यांच्या घरावरील दरोड्याचा अखेर उलगडा झाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - लोणावळा येथील नामांकीत डॉ. खंडेलवाल यांच्या घरी दरोडा (Robbery) टाकून तब्बल 67 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीस (Accused) अखेर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्य प्रदेशात जाऊन बेड्या (Arrest) ठोकल्या. पोलिसांनी आरोपीकडून सव्वा सहा लाख रुपयांची रोकड व 24 लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने असा 30 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Lonavala Dr Khandelwal House Robbery was Finally Solved)

हेमंत रंगराज कुसवाह (वय 24), प्रशांत कुसवाह (वय 27), दौलत भावसिंग पटेल (वय 24), गोविंद थानसिंग कुशवाह (वय 18), प्रदीप लल्लू धानुक (वय 28, सर्व रा. डाबरी, सागर, मध्यप्रदेश), नथू साधू देशमुख (वय 52, रा. औढोली, मावळ), सुनील शेजवळ (वय 40), मुकेश राठोड (वय 45), दीनेश अहिरे (वय 38), संजय शेंडगे (वय 47, सर्व रा. घाटकोपर), रवींद्र पवार (वय 42, रा. अंधेरी), शामसुंदर शर्मा (वय 43, रा. गोरेगाव), सागर धोत्रे (वय 25, रा. हडपसर), विकास गुरव (वय 34, रा. वाकोला, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा: पुणे : पदभरती रद्द केल्यामुळे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये आक्रोश

डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल (वय 73) यांचे प्रधान पार्क सोसायटीमध्ये रुग्णालय असून त्यावरच त्यांचे घर आहे. खंडेलवाल हे नामांकीत पंचक्रोशीतील नामांकीत डॉक्‍टर आहेत. 17 जुन रोजी मध्यरात्री आरोपींनी खिडकीवाटे त्यांच्या घरात प्रवेश करून खंडेलवाल दाम्पत्याचे हातपाय बांधून घरातील 50 लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा 66 लाख 77 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे 8 जणांना मुंबईतुन अटक केली होती. मात्र मुख्य सुत्रधार हेमंत कुसवाह हा मध्यप्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सुनील जावळे, शब्बीर पठाण, मुकूंद अयाचित, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, मुकेश कदम, प्रकाश वाघमारे, महेश गायकवाड, नीलेश कदम, अक्षय नवले यांच्या पथकाने आरोपींच्या तीन आठवडे मध्यप्रदेशात तळ ठोकून सागर जिल्हा पोलिसांच्या मदतीने मुख्य आरोपीस अटक केली. त्याच्याकडून 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मुख्य आरोपीविरुद्ध महाराष्ट्रासह चार राज्यात घरफोडी, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, सचिन काळे, पोलिस उपनिरीक्षक रामेशवर धोंडगे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

हेही वाचा: आंबील ओढ्यालगत असणाऱ्या कॅल्व्हटचे (पूलाचे) काम कधी होणार? नागरिकांचा प्रश्न

अफवेतुनच मिळाली दरोड्याची 'टिप'

डॉ. खंडेलवाल यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, अशी अनेक वर्षांपासून अफवा पसरविली जात आहे. पोलिसांनीही अशाच माहितीच्या आधारे डॉक्‍टरांच्या घराची झाडाझडती घेतली होती, इवढेच नव्हे तर आयकर विभागानेही त्यांच्याघरी छापा घातला होता. मात्र त्यातुन काहीही निष्पन्न झाले नव्हते. दरम्यान, सर्व आरोपी मुंबईतील फिल्मसीटीमध्ये काम करीत होते. त्यावेळी नथूने हेमंतला डॉ.खंडेलवाल यांच्याविषयी टिप दिली. त्यानंतर त्यांनी पुर्वनियोजन करून, काही दिवस डॉक्‍टरांचे रुग्णालय व घराभोवती टेहळणी करून दरोडा टाकला.

'आरोपींनी पुर्वनियोजीत कट रचून डॉ.खंडेलवाल यांच्या घरी दरोडा टाकला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण, गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीद्वारे आठ जणांना अटक केली. त्यानंतर तीन आठवडे मध्यप्रदेशात तळ ठोकून मुख्य आरोपीला अटक केली. लोणावळा पोलिस व सागर जिल्हा पोलिसांनी यासाठी चांगले सहकार्य केले.' डॉ.अभिनव देशमुख, पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण.

loading image
go to top