"Homeopaths in MMC: Controversy Over Modern Medicine Practice"
Sakal
पुणे
Maharashtra Medical Council : होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीला विरोध, 'मार्ड'चे काळ्या फिती लावून आंदोलन
Black Ribbon Protest : होमिओपॅथी डॉक्टरांच्या MMC नोंदणीविरोधात महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी काळ्या फितीचा निषेध केला आहे.
पुणे : आधुनिक चिकित्सा औषधशास्त्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याबाबतचा विरोध वाढत आहे. नोंदणीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हजारो निवासी डॉक्टरांनी (मार्ड) आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी दंडाला काळ्या फिती लावून वैद्यकीय सेवा शांततापूर्ण मार्गाने निषेध केला. ‘बीजे’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘मार्ड’ व प्रशिक्षणार्थी डॉक्टर यामध्ये सहभागी झाले होते.

