
Homoeopathy In News
Sakal
पुणे : राज्याचे महाधिवक्ता यांच्या अनुकूल अभिप्रायानंतर ‘आधुनिक चिकित्सा औषधशास्त्र अभ्यासक्रम’ (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची स्वतंत्र नोंदणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये (एमएमसी) करण्यास वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकताच हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार ‘एमएमसी’मध्ये स्वतंत्र नोंदवही ठेवून त्यांची नोंद करण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीच्या डॉक्टरांप्रमाणे सरसकट प्रॅक्टिस करता येणार नसून, त्यावर काही बंधने असल्याचे ‘एमएमसी’ने स्पष्ट केले आहे.