
Homoeopathy Doctor
Sakal
पुणे : होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांनी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (एमएमसी) नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी रविवारी (ता. २८) पुण्यात केली.