

Nurse Returns Necklace to Original Owner
sakal
पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथे खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका ज्योती बाळासाहेब भागवत यांना रस्त्यात सापडलेले दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र मूळ महिलेचा शोध घेऊन परत केल्याने ज्योती भागवत यांच्या प्रामाणिक पणाचे परिसरात कौतुक होत आहे. येथील माजी सैनिक मेजर विजय कांताराम ढोबळे यांचे अकाली निधन झाले त्यांच्या अंत्यविधीसाठी गावडेवाडी येथील सुजाता भगवान गावडे पारगाव येथे आल्या होत्या त्यांनी गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढुन पाकिटात ठेवले होते अंत्यविधीवरून जाताना ते पाकीट कोठेतरी गहाळ झाले.