गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेल्या बारामतीच्या या अधिकाऱ्याचा सन्मान 

मिलिंद संगई 
Saturday, 2 May 2020

चंद्रशेखर यादव यांना विशेष कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

बारामती (पुणे) : गुन्हे शोधमोहिमेमध्ये वाकबगार असलेले बारामती क्राईम ब्रांचचे प्रमुख पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना विशेष कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. 

चंद्रशेखर यादव यांनी सेवाग्राम, वर्धा शहर, स्थानिक गुन्हे शाखा, इंदापूर, भिगवण व बारामतीत काम केलेले आहे. या काळात त्यांनी यशस्वी शोध मोहिमा राबवीत दरोड्याचे 30, जबरी चोरीचे 49, घरफोडीचे 68, चोरीचे 171, तसेच हत्यार कायद्याचे 31, असे 349 गुन्हे त्यांनी उघडकीस आणले आहेत. यात जवळपास दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले. जुगार, दारू, वेश्‍याव्यवसाय या सारख्या अवैध व्यवसायांवरही त्यांनी हातोडा मारण्याचे काम वेळोवेळी केले आहे. जवळपास 151 अवैध व्यवसायांवर कारवाई करत 17 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

शेतकऱ्याने लावला थेट काश्‍मीरला फोन आणि मिळवले लाखो रुपये  

इंदापूर येथील पळसदेव बॅंक चोरीतील आरोपींना राजस्थान येथे तपास करून अटक करण्यात त्यांना यश आले. या शिवाय भिगवण येथे वाळू माफियांवर पहिली "मोका'अंतर्गत कारवाई; तसेच दरोडा, जबरी चोरी करणारे यांना सतर्क रात्रगस्त राबवून सापळे लावून पकडले.महावितरणच्या डीपी चोरीप्रकरणी अतिशय सराईत आरोपींना सलग दोन महिने कष्ट करून सापळा लावून त्यांनी पकडले. त्यानंतर हे नुकसान थांबल्यामुळे तत्कालीन आमदार व नागरिकांनी पोलिस ठाण्यात येऊन त्यांचा सत्कार केला होता. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

बारामती, दौड, इंदापूर, शिरूर, शिक्रापूर, जेजुरी या परिसरात जबरी चोऱ्या करणारे, दरोडे व खुनासह दरोडे घालणाऱ्यांना जेरबंद करून अनेक गुन्हे चंद्रशेखर यादव यांनी उघडकीस आणले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Honor to this officer of Baramati