मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; पुण्यात हॉटेल चालक लागले कामाला

The hopes of the hotel operators have been dashed due to the promise given by the Chief Minister
The hopes of the hotel operators have been dashed due to the promise given by the Chief Minister

पुणे : लॉकडाऊन दरमान्य मिळालेल्या सवलतीमुळे शहरातील काही हॉटेल सुरू झाले आहेत. मात्र त्यांना मिळणारा प्रतिसाद हा अत्यल्प असून पार्सलसाठी केवळ दहाच टक्के ऑर्डर येत आहेत. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूतोवाचमुळे हॉटेल व्यावसायिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. काहींनी हॉटेल सुरू करण्याची तयारी देखील सुरू केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या हॉटेलमध्ये बसून विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यास परवानगी नाही. मात्र काही दिवसांपूर्वी पार्सल सुरू करण्याची सवलत देण्यात आली. त्यानुसार शहरातील 10 ते 15 टक्के हॉटेल व्यवसायिकांनी पार्सल देणे सुरू केले. मात्र कोविड-19 पूर्वीचा विचार करता केवळ दहा टक्के खवय्ये पार्सल नेत आहेत. त्यामुळे कामगारांना पगार देणे, हॉटेलचे भाडे असे अनेक खर्च व्यवसायिकांना परवडेनासे झाले आहे. तर काम व पगार नसल्याने कामगारही चिंतेत आहेत. या सर्वांनाचा विचार करता हॉटेल पूर्णपणे खुली करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी हॉटेल व्यवसाय संघटना करत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. त्यात झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे सरकारने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे व्यवसाय सुरू होईल, अशी आशा हॉटेल व्यवसायिक बाळगून आहेत.

पुणेकरांनो ही चूक करु नका, नाहीतर... धडा शिकविण्याची प्रशासनाची भूमिका 

याबाबत पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले की, हॉटेलमध्ये मर्यादित कर्मचारी असावेत, दोन टेबलमध्ये सामाजिक अंतर हवे, जेवणाची प्लेट व ग्लास एकदाच वापर करणारी असावी, ग्राहकांचे हॉटेलमधील येताना तापमान तपासणे, त्यांच्यासाठी सॅनिटायझेशनची सुविधा उभारणे, वॉशरूम आणि टेबल सतत स्वच्छ करणे, ग्राहकांना सेवा पुरवताना कोणती खबरदारी घ्यायची याचे मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना करणे, अशा बाबी व सरकार नियमावली करेल त्याचे देखील तंतोतंत पालन केले जाईल. 

फायनान्स कंपनीलाच घातला 51 लाखांना गंडा; कसा? वाचा सविस्तर

कामगारांची समस्या कायम :

वेटर, कुक आणि हॉटेल व्यवस्थापन व्यवस्थापनातील बरेचशे कर्मचारी परराज्यातील आहेत. मर्यादित कामगारांमध्ये पार्सल किंवा हॉटेल पूर्णतः बंद असल्याने ते अद्याप त्यांच्या गावी आहेत. त्यांना कामावर येण्यास काही दिवसांचा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे कामगार मिळण्याचे आव्हान अजूनही कायम आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

काय सांगता? मेसेज आता अधिक सुरक्षित; पुण्यातील तरुणाने तयार केले 'मेझो अॅप' 

''मोठ्या हॉटेलमधील रेस्टॉरंट करू सुरू करण्याबाबत सध्या सकारात्मक चर्चा होत असल्याचे समजले. त्यासह इतर हॉटेलदेखील सुरू होणे गरजेचे आहे. हॉटेल व्यवसाय व त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे अर्थचक्र पूर्णतः थांबले आहे. सरकार ठरवेल त्या नियमानुसार व्यवसाय सुरू करण्याची तयारी आहे. पार्सलसाठी असलेल्या नियमांनुसार हॉटेल सुरू करण्याची तयारी काहींनी सुरू केली आहे.''
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन 

पुण्यातला त्रिशुंड गणपती तुम्हाला माहिती आहे का? पाहा व्हिडिओ! 

''लॉकडाऊन सुरू झाल्यापासून माझे हॉटेल पूर्णतः बंद आहे. गेल्या महिन्यापर्यंत कामगारांना पगार दिला. मात्र आता तेही शक्य नाही. त्यामुळे सरकारने योग्य ती नियमावली करून हॉटेल सुरू करण्यास परवानगी द्यावी. असेच सुरू राहिले तर व्यवसाय करणे मुश्किल होऊन जाईल.''
- किरण पाटील, हॉटेल व्यवसायिक

पुणेकरांनो, आता तरी नियम पाळा; 16 दिवसांमध्ये 10 हजार जण कोरोनाबाधित! 

''15 दिवसांपूर्वी आमचे हॉटेल पार्सल सेवा देण्यासाठी सुरू झाले आहे. त्यामुळे आता किमान पगार तरी मिळेल. त्यापूर्वी मात्र वाईट परिस्थिती होती. आता सर्वच सुरळीत होत आहे व नागरिक काळजी देखील घेताय. त्यामुळे हॉटेल सुरू करण्यासही परवानगी मिळावी.''
- रितेश झंवर, हॉटेल कर्मचारी

पुणे : महापालिकेचे पदाधिकारी पॉझिटिव्ह तर, दोन खासदार, चार आमदार होम क्वारंटाईन 

पुण्यातील हॉटेलांची सद्यस्थिती : 
- शहरात आठ हजार हॉटेल-रेस्टॉरंट
- त्यातील 10 ते 15 टक्के पार्सल सेवा सुरू
- पार्सल घेण्यासाठी येणारे ग्राहक केवळ 10 टक्के
- शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये 50 रेस्टॉरंट
- जिल्ह्यात अडीच हजार बिअरबार

हॉटेल चालक ही काळजी घेणार : 
- दोन टेबलमध्ये सामाजिक अंतर
- एकदाच वापराच्या प्लेट व ग्लासचा वापर
- सेवा कशी द्यायची याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
- वेळोवेळी वॉशरूम, टेबलची साफसफाई
- जेवायला आलेल्या ग्राहकांच्या तापमानाची तपासणी
- ठिकठिकाणी सॅनिटायझर व शक्य तिथे पूर्ण सॅनिटायझेशनची सुविधा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com