

Severe Road Mishap in Bhigwan-Baramati; Tractor Torn Apart, Driver Dies in Blaze
Sakal
भिगवण : भिगवण बारामती रस्त्यावर पिंपळे(ता.इंदापुर) येथे शनिवारी(ता.०६) रात्री साडे दहाच्या सुमारास ऊस वाहतुक करणारा ट्रॅक्टर व ट्रक यांच्या दरम्यान भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांना लागलेल्या आगीमध्ये ट्रॅक्टर चालकाचा आगीत होरपळुन जागीच मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. भिगवण बारामती रस्त्यावरील ऊस वाहतुक करत असलेल्या वाहनांचे अपघाताचे सत्र थांबत नसुन चालु हंगामातील हा तिसरा बळी ठरला आहे. प्रशासनाने तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.