
पुणे-सोलापूर महामार्गावरी अपघाताचं सत्र सुरुच असून कंटेनरला लागलेल्या भीषण आगीनंतर आता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात बुधवारी पहाटेच्या वेळी झाला.