
काटेवाडी : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील बारामती- इंदापूर एसटी बस मध्ये काटेवाडी नजीक एका माथेफिरूने सहकारी प्रवाशावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १) सकाळी ११ च्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये एक जण जखमी झाला असून वार करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी घटनास्थळी ताब्यात घेतले आहे.