पुण्यातील रुग्णालयांच्या ओपीडी फुल्ल, रुग्णसंख्येचा स्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

opd
पुण्यातील रुग्णालयांच्या ओपीडी झाल्या फुल्ल

पुण्यातील रुग्णालयांच्या ओपीडी फुल्ल, रुग्णसंख्येचा स्फोट

पुणे - गेल्या काही दिवसांपासून हवामानात (Environment) सातत्याने होत असलेले बदल. (Changes) अचानक वाढत असलेला गारठा. (Cold) तसेच विषाणूजन्य आजारांचे (Sickness) प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक पुणेकर सध्या सर्दी, खोकला, घसादुखी, ताप आणि अंगदुखीने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात कोरोनाचे रुग्ण (Corona Patients) पुन्हा वाढत असल्याने तपासणीसाठी रुग्णालयांमध्ये गर्दी होत असून खासगी रुग्णालयांसोबतच शासकीय रुग्णालयांच्या ओपीडी फुल्ल झाल्या आहेत.

दिवसा कडक ऊन आणि रात्री कडाक्याची थंडी यामुळे विषाणूजन्य आजारांची साथ सुरू झाली आहे. या आठवड्यात पुन्हा तापमान घसरले आहे. त्यामुळे दिवसाही थंडीचा परिणाम जाणवत होता. तर मधेच पुन्हा तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे सतत होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने वातावरणातील बदल घातक ठरत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला, घसादुखी, ताप, संधिवात, कफ होणे यांसारखे आजार उद्‌भवतात. लहान मुलांसाठी असे वातावरण काहिसे धोकादायक आहे. मात्र योग्य काळजी घेतल्यास घाबरण्याचे कारण नाही. थंडीच्या दिवसांत थोडी काळजी, योग्य आहार आणि त्याला व्यायामाची जोड दिल्यास थंडी उपयुक्तच ठरत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा: पुण्यासाठी कोव्हॅक्सीनचे शनिवारी ३५ हजार डोस

डॉक्टरांनी दिलेला सल्ला :

- उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा

- आहारात दूध, तुपाचा वापर करावा

- गरम पाणी प्यावे

- गुळाचे पदार्थ खावे

- चालण्याचा व्यायाम जास्त उपयुक्त

- तिळाच्या तेलाने शरीराला मसाज करावी

- थंड पदार्थ खाणे आवर्जून टाळा

- स्वेटर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे वापरावे

- शिंक येताच नाकावर रुमाल धरा

वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी खोकला होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाची देखील हीच लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांचं असे आजार असल्यास दवाखान्यात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही आजारावर स्वतः गोळ्या घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेतलेले कधीही चांगले. त्यामुळे नागरिक डॉक्टरकडे जात आहे हे चांगलंच आहे. कारण कोरोनाची लागण असेल तर त्यावर वेळेत उपचार करता येईल. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी.

- डॉ. डी. बी. कदम, सदस्य, कोरोना टास्क फोर्स

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsHospital
loading image
go to top