
Hospital Strike
Sakal
पुणे : ‘‘गेल्या नऊ महिन्यांचा पगार थकलाय. रुग्णालयापर्यंत येण्यासाठी गाडीभाडे नसल्याने पायी येतोय. घरभाडे द्यायला पैसे नसल्याने घरमालक राहू देईना. मुलांची शाळेची फी थकलीय. भाजी आणण्यासाठी पैसे नसल्याने दुपारचा डब्यासाठीही भाजीऐवजी चटणी घेऊन येतो व तीच सुक्या चपातीबरोबर खातो,’’ अशा व्यथा नऱ्हे येथील श्रीमती काशीबाई नवले रुग्णालयात काम करत असलेल्या परिचारिका, मावशी, मामा, तंत्रज्ञ व अशैक्षणिक कामे करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी मांडल्या.