मोशीतील वसतिगृहात दीडशे जणांसाठी मागविल्या ८० फाटक्‍या गाद्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

मोशीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती विद्यार्थी वसतिगृहात विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी कॉट, ब्लॅंकेट नाही. त्याचप्रमाणे अभ्यासासाठी ग्रंथालय व त्यात टेबल खुर्ची नसल्यामुळे गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांसाठी बुधवारी (ता. ११) फाटक्‍या गाद्या मागवून थट्टा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. वसतिगृहात सुविधा पुरविण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

भोसरी - मोशीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती विद्यार्थी वसतिगृहात विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी कॉट, ब्लॅंकेट नाही. त्याचप्रमाणे अभ्यासासाठी ग्रंथालय व त्यात टेबल खुर्ची नसल्यामुळे गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांसाठी बुधवारी (ता. ११) फाटक्‍या गाद्या मागवून थट्टा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. वसतिगृहात सुविधा पुरविण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

थंडी वाढत असताना सुविधांअभावी विद्यार्थ्यांना फरशीवर झोपण्याची वेळ आली आहे. विद्यार्थी संख्या दीडशे असताना त्यांच्यासाठी केवळ ८० गाद्या मागविण्यात आल्या. मात्र, त्याही फाटलेल्या आणि तात्पुरत्या वेळेसाठी मागविण्यात आल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे ब्लॅंकेटही पुरविण्यात आलेले नाहीत. राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालयही नाही. खोल्यांमध्ये अभ्यास करण्यासाठी टेबल आणि खुर्च्यांचीही सोय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. वसतिगृहात विज्ञान शाखेबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेल्या पुस्तकांनी सुसज्ज ग्रंथालयाची मागणी विद्यार्थ्यांची आहे. वसतिगृहात सीसीटीव्हीही बसविलेले नाहीत. भौतिक सुविधा तातडीने न मिळाल्यास नागरी हक्क समितीद्वारे आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा सचिव गिरीश वाघमारे यांनी दिला आहे. वसतिगृहाच्या सीमाभिंतीला लागूनच हातभट्टीचा गुत्ता आहे. याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक असलेल्या बाबींसाठी वेळोवेळी सरकारकडे मागणी केली आहे. मात्र, कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. 
- विशाल लोंढे, विशेषाधिकारी, समाज कल्याण विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hostel issue in moshi