Pune : हॉटेल कर्मचाऱ्याची 13 व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide

हॉटेल कर्मचाऱ्याची 13 व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या

पुणे : मुंढव्यातील पेंट हाऊस या हॉटेलमधील कर्मचाऱ्याने इमारतीच्या 13 व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी कर्मचाऱ्याने फेसबुक लाईव्ह करीत हॉटेल प्रशासनातील काही व्यक्तींवर आरोप केले होते. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात हॉटेल प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हि घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

अरविंदसिंग भुपालसिंग राठोड (वय 26, रा. मेहाली, उत्तराखंड) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी नीरजसिंग मेहरा (वय 21, रा. विक्रोळी, मुंबई) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन हॉटेल पेंट हाऊसच्या प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेहरा यांचा मेव्हणा अरविंदसिंग राठोड हा मुंढव्यातील एबीसी रस्त्यावरील हॉटेल पेंट हाऊसमध्ये एक महिन्यापासून वेटरचे काम करीत होता. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तो हॉटेलच्या 13 व्या मजल्यावर गेला. तेथून त्याने फेसबुक लाईव्ह केले. त्यामध्ये त्याने हॉटेल प्रशासनातील काही व्यक्‍तींवर आरोप केले. त्यानंतर त्याने 13 व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, त्याच्या आत्महत्येसंदर्भातील व्हिडीओ क्‍लिप त्याच्या नातेवाईकांना मिळाली आहे. त्यावरुन त्यास हॉटेलमधील काही व्यक्ती त्रास देत होत्या. त्यांच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. या याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन भोसले करीत आहेत.

loading image
go to top