Pune News : कारवाईनंतर माणिकबागेतील हॉटेल लगेच सुरु

सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथील खाऊगल्लीत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज कारवाई करून फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणे हटविली.
Hotel in Manikbaug Reopens Immediately After Civic Action

Hotel in Manikbaug Reopens Immediately After Civic Action

sakal

Updated on: 

पुणे - सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथील खाऊगल्लीत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज कारवाई करून फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणे हटविली. येथे वाहनांच्या पार्किंगसाठी सोय होणे अपेक्षित होते. पण महापालिकेचे पथक कारवाई करून निघून गेल्यानंतर अवघ्या दोन-तीन तासांत याठिकाणची खाऊगल्लीतील भटारखाने पुन्हा सुरू झाले. फ्रंट मार्जिनमध्ये टेबलखुर्च्या टाकून व्यवसाय सुरू केला गेला. त्यामुळे हा महापालिकेच्या कारवाईच्या परिणामकारकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...