esakal | हॉटेल व्यावसायिकांचे 'वाजले की बारा'; लॉकडाउनच्या नव्या नियमावलीतही परवानगी नाहीच!
sakal

बोलून बातमी शोधा

Hotel_Business

शहरात असलेल्या आठ हजार हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारपैकी केवळ 10 ते 15 टक्के हॉटेलमध्ये पार्सल सुरू आहेत. केवळ ग्राहक टिकवायचे आणि दैनंदिन खर्च भागविण्यासाठी सुरू असलेला हा खटाटोप देखील परवडत नाही, असे व्यावसायिक सांगतात.

हॉटेल व्यावसायिकांचे 'वाजले की बारा'; लॉकडाउनच्या नव्या नियमावलीतही परवानगी नाहीच!

sakal_logo
By
सनील गाडेकर

पुणे : हॉटेल चालवायचे कसे? असा प्रश्‍न सध्या माझ्यापुढे आहे. आत्तापर्यंतच्या व्यवसायात मला कधीही एवढी अडचण आली नाही. सर्व कामगारांना पूर्ण पगार देणे देखील मुश्‍कील झाले आहे. हॉटेल सुरू झाले तरी ग्राहक येतील असे वाटत नाही. त्यामुळे किमान एक वर्ष अशीच परिस्थिती राहणार असल्याने हॉटेल व्यवसायाचे भविष्य अंधारात आहे, अशी भीती हॉटेल व्यावसायिक विश्‍वनाथ शेट्टी यांना वाटत आहे.

शेट्टी हे गेल्या 30 वर्षांपासून हॉटेल व्यवसायात आहेत. त्यांचे कोथरूड येथे 'शीतल' नावाचे रेस्टॉरंट आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जून महिन्यापर्यंत ते पूर्णतः बंद होते. नियमितचे ग्राहक टिकावे यासाठी त्यांनी पार्सल सेवा सुरू केली. मात्र, त्यास केवळ 10 टक्के प्रतिसाद आहे. त्यातून दैनंदिन खर्च चालवणे देखील मुश्‍कील होत आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे : 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग'पद्धतीनं सुरू झालंय भुयारी मेट्रोचं काम!​

शहरात असलेल्या आठ हजार हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारपैकी केवळ 10 ते 15 टक्के हॉटेलमध्ये पार्सल सुरू आहेत. केवळ ग्राहक टिकवायचे आणि दैनंदिन खर्च भागविण्यासाठी सुरू असलेला हा खटाटोप देखील परवडत नाही, असे व्यावसायिक सांगतात. तर ज्यांची हॉटेल भाड्याच्या जागेत आहेत ते जागा मालकाकडे भाडे माफ किंवा कमी करण्याची विनंती करीत आहेत. जागा मालकांनी समजूतदारपणा दाखवला, तर त्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र, कामगारांचा पगार कसा द्यायचा. त्यांना पगारच दिला नाही तर ते परत येतील का? ही चिंता अजूनही त्यांना सतावत आहे. तर काहींनी आता हॉटेल बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

चारित्र्याच्या संशयावरून 'त्याने' पत्नीला पुलावरून नदीत ढकलले; संगमपुलाजवळ घडली घटना​

परवानगीचा आदेश निघण्याची आस :
लॉकडाऊनची नवीन नियमावली एक सप्टेंबरपासून जारी करण्यात आली आहे. मात्र त्यात हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. रूम असलेले हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाउस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश आहेत. मात्र ग्राहकच येत नसल्याने परवानगी मिळून देखील त्याचा काही फायदा होत नसल्याचे मोठ्या हॉटेल चालकांनी सांगितले. त्यामुळे सर्व हॉटेल सुरू करण्यास परवानगी देणारा आदेश येण्याची वाट व्यावसायिक पाहत आहेत. या सर्वांत या क्षेत्रात काम करणाऱ्या अडीच लाख कामगारांचा रोजगार देखील टांगणीला लागला आहे.

पथ विक्रेते बनणार आत्मनिर्भर; विनातारण मिळणार १० हजारांचं कर्ज!

सरकार सांगेल त्याप्रमाणे आम्ही व्यवसाय करण्यास तयार आहोत. मात्र आता जेवणासाठी हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करणे गरजेचे आहे. पूर्वी माझ्याकडे 60 कर्मचारी होते. आता केवळ 20 लोकांवर काम सुरू आहे. जी लोक कामावर नाहीत त्यांना पगार कसा द्यायचा असा प्रश्‍न आहे. त्यामुळे आता सरकार याबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे.
- विश्‍वनाथ शेट्टी, शीतल रेस्टॉरंट, कोथरूड

- सुमारे साडेपाच महिने शहरातील 85 ते 90 टक्के हॉटेल बंद
- अडीच लाख कामगारांच्या रोजंदारीचा प्रश्‍न
- व्यवसाय कधी सुरळीत होणार याची हॉटेल चालकांना चिंता
- कोरोनाच्या भीतीने नागरिक येणार नसल्याची भीती
- भाडे माफ किंवा कमी करण्यासाठी जागा मालकांकडे विनवणी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image