esakal | पार्सलसेवेसाठी हॉटेल व रेस्टॉरंट सातनंतरही राहणार खुले 
sakal

बोलून बातमी शोधा

पार्सलसेवेसाठी हॉटेल व रेस्टॉरंट सातनंतरही राहणार खुले 

या निर्णयामुळे सकाळी नऊ वाजता खुले केलेले हॉटेल रात्री दहापर्यंत सुरू ठेवता येणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पार्सल अभावी गैरसोय होणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पार्सलसेवेसाठी हॉटेल व रेस्टॉरंट सातनंतरही राहणार खुले 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ऑर्डरची संख्या वाढण्याच्या वेळीच हॉटेल बंद करावे लागत असल्याने हॉटेल चालकांचे होणारे नुकसान आता थांबणार आहे. तसेच खाद्यपदार्थांचे पार्सल मिळण्यासाठी नागरिकांना करावे लागणारे प्रयत्न देखील कमी होणार आहेत. पार्सल सेवा पुरविणारे हॉटेल व रेस्टॉरंट आता सायंकाळी सातनंतरही खुली ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


या निर्णयामुळे सकाळी नऊ वाजता खुले केलेले हॉटेल रात्री दहापर्यंत सुरू ठेवता येणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पार्सल अभावी गैरसोय होणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाउनमुळे हॉटेल व रेस्टॉरंटना केवळ पार्सल आणि "टेकअवे' सेवा पुरविण्याची मुभा आहे. त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यात सायंकाळी सात वाजल्यानंतर सुरू असलेल्या हॉटेलांना दंड आकारात ते बंद करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. पालिकेकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे नागरिकांचे जेवणाचे हाल तसेच व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पार्सल सेवा देण्यास रात्री अकरापर्यंत मुभा द्यावी, अशी मागणी केली. त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पार्सलची वेळ वाढवली आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संध्याकाळी सातनंतर ऑर्डरचे प्रमाण वाढते. पार्सल सेवा पुरविणा-या हॉटेलचा आकडा हळू-हळू वाढत आहे. मात्र अद्याप तो 20 टक्‍क्‍यांच्या पुढे गेलेला नाही. 
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन 

loading image
go to top