
बाजारात मिळणाऱ्या काही वस्तू आपण स्वतः घरी तयार करून पाहण्यातली मौज शार्दूल आणि शर्वरी सतत आईच्या माध्यमातून अनुभवतात. त्यात नवनवीन कल्पना लढवून बाजारापेक्षा वेगळी वस्तू निर्माण केल्याचं समाधान त्यांना मिळतं. आत्मविश्वास वाढण्याबरोबरच स्वावलंबनाची एक एक पायरी ते चढत जातात.
बाजारात मिळणाऱ्या काही वस्तू आपण स्वतः घरी तयार करून पाहण्यातली मौज शार्दूल आणि शर्वरी सतत आईच्या माध्यमातून अनुभवतात. त्यात नवनवीन कल्पना लढवून बाजारापेक्षा वेगळी वस्तू निर्माण केल्याचं समाधान त्यांना मिळतं. आत्मविश्वास वाढण्याबरोबरच स्वावलंबनाची एक एक पायरी ते चढत जातात.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
प्रज्ञा देवधर ही तरुणी तशी म्हणायला साधी गृहिणी. पण या गृहिणीपणाची समृद्धी नित्य जपण्याचा मंत्र जणू तिला गवसला आहे. घरातली सर्व कामं नियोजनबद्ध रीतीने संपवत ती ताज्या दमाने नवनवीन काही करू पाहत असते. ती म्हणाली, ‘‘माझी मुलं शार्दूल आणि शर्वरी माझ्या सर्व प्रयोगांमध्ये उत्साहाने सहभागी असतात. बाजारात विकत मिळणाऱ्या किती तरी वस्तू मी त्यांच्या सोबतीनं घरी करून पाहते. त्यात आम्ही निरनिराळ्या गमती शोधत असतो.’’
नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्याच्या सणाला आम्ही सर्वांनी मिळून साखर गाठ्यांचा सुबक हार बनवला.’’ शर्वरीने सांगितलं की, आईने खास गाठ्यांसाठी साखरेचा पाक कसा तयार करायचा हे कृतीसह सांगितलं. मग ताटलीत ठेवलेल्या दोऱ्यावर पाकाचे ठिपके टाकले. ते पटापट घट्ट झाले. त्याआधी आम्ही त्यांच्यावर रंगीत गोळ्या चिकटवल्या. हा हार फार भारी झाला होता.’’
शार्दूल म्हणाला, ‘‘परवा आम्ही साबण बनवला. त्याचे मजेशीर गोल, चपटे मस्त आकार आम्ही तयार केले. आईने कलिंगडाच्या फोडींच्या आकार आणि अगदी तशाच रंगाचा साबण आमच्यासाठी केला तेव्हा मला ते ‘स्पेशल गिफ्ट’ वाटलं.’’
प्रज्ञा यांच्या सासूबाई (अंजली) छंद म्हणून शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार करतात. त्यांचं पाहून या मायलेकांनी नवं काही करून पाहण्याच्या ओढीने भातुकलीची भांडी बनवली. कोथरूडमधील आपल्या घरी एखादा खाऊ किंवा कलाकृती करून पाहण्यात ही मंडळी सतत दंग असते. हे घर म्हणजे या तिघांची आनंदशाळाच आहे.