'सकाळ वास्तू एक्स्पो'मध्ये वेगवेगळ्या किमतीची घरे उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Vastu Expo 2022

‘सकाळ’ने आयोजित केलेल्या वास्तू प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये ग्राहकांना विविध लोकेशनची वेगवेगळ्या किमतीतील घरे उपलब्ध आहेत.

'सकाळ वास्तू एक्स्पो'मध्ये वेगवेगळ्या किमतीची घरे उपलब्ध

पुणे - ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या वास्तू प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये ग्राहकांना विविध लोकेशनची वेगवेगळ्या किमतीतील घरे उपलब्ध आहेत. त्यामुळे घर घेऊ इच्छिणाऱ्यांना एकाच छताखाली विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

या प्रदर्शनात शहरातील प्रमुख भागांत सुरू असलेल्या व अन्य बांधकाम प्रकल्पांविषयी ग्राहकांना मिळत आहे. यात १ बीएचकेपासून ३ बीएचकेपर्यंत तसेच लक्झरियस फ्लॅटचा समावेश आहे. सुमारे २५ लाखांपासून ते चार कोटीपर्यंतच्या फ्लॅटचादेखील येथील सहभागी प्रकल्पांत समावेश आहे.

विकसक म्हणतात...

सुनियोजित रचना हे या वास्तुप्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे. तसेच या परिस्थितीत तापमान नियंत्रित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक ग्राहक सहजपणे येथे येत असून, चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत आहे. आमच्या कंपनीचे ब्रँडिंग करण्यासाठी याद्वारे चांगली संधी मिळाली आहे.

- प्रशांत लेणे, विक्री व्यवस्थापक, अमनोरा

प्रदर्शनाच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यातील संबंध दृढ होण्याची संधी मिळाली आहे. यामुळे आपले हक्काचे घर घेण्याची ग्राहकांची प्रतीक्षा संपणार आहे.

- श्रीकांत शिंदे, विक्री व्यवस्थापक, नंदन डेव्हलपर्स

‘सकाळ’ने प्रदर्शनाचे अतिशय नियोजनबद्ध आयोजन केले आहे. याबद्दल ‘सकाळ’चे अभिनंदन. आम्ही प्रदर्शनात ग्राहकांचीही चांगली उपस्थिती अनुभवत आहोत.

- रवींद्र इटकळ, व्हीटीपी मार्केटिंग टीम

प्रदर्शनात आलेल्या ग्राहकांचा चांगला प्रतिसाद चांगला आहे. सध्या अनेकजण वडगाव, धायरी, नऱ्हे, आंबेगाव, नांदेड सिटी परिसरात घरे घेण्यास पसंती देत आहेत.

- विजय रायकर, अध्यक्ष, सुमेरू समूह

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणारा हा प्रतिसाद महत्त्वाचा असून, विश्वसनीय ग्राहकांची मागणी वाढत आहे.

- स्वप्नील शेडबाळे, विक्री व्यवस्थापक, परांजपे स्कीम्स

नागरिक म्हणतात...

येथे आलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी सामान्य माणसाच्या आवाक्यातील योग्य ऑफर्स ठेवल्या आहेत. मला किरकटवाडी येथे घर घेण्याची इच्छा आहे. त्या भागातील बांधकाम व्यावसायिक येथे उपलब्ध असल्याने मला घर निवडण्यासाठी सोयीचे झाले आहे.

- शीतल मसवडे

शहरातील प्रमुख बांधकाम व्यावसायिक या वास्तू एक्स्पोमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे शहरात पाहिजे त्या ठिकाणी दर्जेदार घरे घेण्यास सोपे जात आहे.

- स्मिता कुलकर्णी

पुण्यातील सर्व एरिया कव्हर यामध्ये केला आहे. येथे घर घेण्यासाठी अनेक पर्याय पाहायला मिळतात. एक्स्पोमध्ये आल्यानंतर भागात किती बिल्डर काम करीत आहेत, याचा अंदाज येतो.

- मेघा वासकर

सामन्यांना घरे मिळण्यासाठी रेरा रजिस्टर प्रोजेक्टमध्ये कमीतकमी किमतीत घरे उपलब्ध झाली पाहिजेत. असे वास्तू एक्स्पो इतर भागातही झाल्यास ग्राहकांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल.

- युवराज सूर्यवंशी

या ठिकाणी घर घेण्याचे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. एन.ए. (बिगरशेती) प्लॉटसाठी सर्व माहिती या ठिकाणी मिळाली.

- ऋतिक उरसळ

सकाळ वास्तू एक्स्पो २०२२ बद्दल

  • १, २ व ३ बीएचकेच्या घरांपासून ते प्रीमिअम घरांपर्यंत अनेक पर्याय

  • बंगलोज् आणि एनए प्लॉट अशा विविध पर्यायांचा समावेश

  • गृहप्रकल्पात असलेल्या सुविधा समजून घेण्यासाठी एक्स्पो पूरक ठरणार

  • आपण घर घेऊ इच्छिणारे अनेक प्रकल्प एकाच ठिकाणी उपलब्ध

घराची निवड करणे होतेय सोपे

घर कोणत्या भागात घ्यावे इथपासून ते घेण्याच्या निर्णय झाल्यानंतरची कागदपत्रांची प्रक्रिया काय असते, असे अनेक प्रश्‍न घर घेताना मनात असतात. वास्तू खरेदी करीत असताना पडत असलेल्या या प्रश्‍नांचा विचार करत निवासी व व्यावसायिक प्रकल्पांची सविस्तर माहिती प्रदर्शनात मिळणार आहे. गृह वा व्यावसायिक प्रकल्पात गुंतवणूक करायची असेल तर कोणता पर्याय योग्य ठरेल? त्यांचे बजेट काय आहे? कोणत्या प्रकल्पांमधून कोणत्या सुविधा मिळणार? कोणत्या ठिकाणी गुंतवणूक कशी फायद्याचे ठरू शकते? तेथील परिसराचा विकास कसा होतो आहे? या व अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे एक्स्पोमधून बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या प्रतिनिधींशी संवादातून मिळणार आहेत. यामुळे घराची निवड करणे आणखी सोपे होणार आहे.

बंगले आणि एनए प्लॉटदेखील

आपले कुठेतरी सेकंड होम किंवा शहराबाहेर रो हाउस किंवा बंगला असावा, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र, त्याचे चांगले पर्याय उपलब्ध होत नसल्याने किंवा योग्य ठिकाणचे प्लॉट नसल्याने ते स्वप्न पूर्ण होत नाही. या एक्स्पोने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. कारण एक्स्पोमध्ये सदनिकांसह बंगलोज् आणि एनए प्लॉटदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बंगलोज् आणि एनए प्लॉटच्या खरेदीसाठीची सर्व प्रक्रिया अगदी सुरळीतपणे पार पाडण्यासाठीची काळजी प्रदर्शनात असलेल्‍या विकसकांनी घेतली आहे. त्यामुळे आपल्या सेकंड होमची, बंगल्यात राहण्याची किंवा प्लॉट घेऊन तेथे बांधकाम करण्याची संधी या एक्स्पोच्या माध्यमातून सुखकर झाली आहे.

सकाळ वास्तू एक्स्पो, पुणे

कधी : १ मे २०२२

कुठे : महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे

वेळ : सकाळी ११ ते रात्री ८

प्रवेश व पार्किंग : मोफत

टॅग्स :puneSakalvastu tips