पुणे : सोसायटीच्या अध्यक्षाला बेदम मारहाण; व्हिडिओ पाहून बसेल धक्का !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

सोसायटीने निर्धारीत केलेले वाहन परवान्याचे स्टिकर वाहनाला का लावले नाही असे विचारणाऱ्या सोसायटीच्या अध्यक्षास सदनिकाधारक व त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण केल्याचा प्रकार दिघीतील इंदुबन सोसायटीत घडला. याबद्दल दिघी पोलिसांनी तीघांना ताब्यात घेतले आहे.

भोसरी (पुणे) : सोसायटीने निर्धारीत केलेले वाहन परवान्याचे स्टिकर वाहनाला का लावले नाही असे विचारणाऱ्या सोसायटीच्या अध्यक्षास सदनिकाधारक व त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण केल्याचा प्रकार दिघीतील इंदुबन सोसायटीत घडला. याबद्दल दिघी पोलिसांनी तीघांना ताब्यात घेतले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याविषयी सोसायटीचे अध्यक्ष सचिन सुभाष सूर्यवंशी यांनी सदनिकाधारक डॉ. एस. के. मिश्रा व अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघीतील संत निरंकारी भवनाजवळील इंदूबन सोसायटीने सदनिकाधाराकांना वाहन पार्किंगसाठी सोसायटीचे स्टीकर वाहनाला लावण्याचे बंधन घातले आहे. यासाठी ३१ जानेवापर्यंतची मुदत दिली होती. रविवारी (ता. २) संध्याकाळी सदनिकाधारक मिश्रा यांच्या मुलाने वाहनाला स्टीकर न लावल्याबद्दल सोसाटीचे अध्यक्ष सचिन सुभाष सूर्यंवंशी यांनी जाब विचारल्याबद्दल त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

मिश्रा कटुंबियांनी त्यांचे नातेवाईक आणि मित्रांना बोलावून सूर्यवंशी यांना मारहाण केली. सोसायटीच्या केबीनचीही तोडफोड केली. सूर्यवंशी यांना डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दस्तगीर तांबोळी करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Housing Society president brutally assaulted Bhosri Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: