
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेला निलेश चव्हाण याला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. तो २१ मेपासून फरार होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र तो नेपाळमध्ये पोहोचला कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत माहिती समोर आली आहे.