esakal | पुण्यातला रेडलाईट एरिया कोरोनापासून कसा वाचला?
sakal

बोलून बातमी शोधा

how budhwar peth red light area safe from coronavirus marathi

लॉकडाउन काळात हा सर्व परिसर चारही बाजूने पत्रे लावून सील करण्यात आला होता. परिसरातून कोणी बाहेर जाणार नाही किंवा यात येणार नाही यावर लक्ष ठेवण्यात येत होते.

पुण्यातला रेडलाईट एरिया कोरोनापासून कसा वाचला?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच अगदी मध्यवर्ती  भागात असलेल्या बुधवार पेठेतील वेश्या परिसरात व्यवसाय परिसरात कोरोनाचा शिरकाव होऊ न देण्यात महापालिका आणि पोलिस प्रशासनास यश आले आहे. हा परिसर आता खुला करण्यात आल्याने व एकही रुग्ण न आढळल्याने आनंद साजरा करण्यासाठी येथील महिलांनी रविवारी घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मार्चमध्ये संचारबंदी लागू झाल्यावर शहरातील काही अनेक भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. बुधवार पेठेतील रेड लाईट एरिया भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येतो. खबरदारीचा उपाय म्हनुन हा भाग पत्रे लावून सील करण्यात आला होता. जवळपास तीन महिन्यानंतर येथील काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या काळात रेड लाईट भागातील महिलांनी पोलिसांना आणि येथील मंडळाच्या कार्यकर्त्याना सहकार्य केले. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालनही केले. या भागात दोन ते अडीच हजार महिला वास्तव्यास आहेत. याबाबत शुक्रवार पेठ पोलिस चौकीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा तावडे यांनी सांगितले की, लॉकडाउन काळात हा सर्व परिसर चारही बाजूने पत्रे लावून सील करण्यात आला होता. परिसरातून कोणी बाहेर जाणार नाही किंवा यात येणार नाही यावर लक्ष ठेवण्यात येत होते. तेथील महिलांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दूध, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. हे सर्व सामान अगदी त्यांच्या घरात नेऊन देण्यात येत होते. यापुढील काळात देखील येथील कोरोनाची परिस्थिती अशीच रहावी, यासाठी फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.

आणखी वाचा - 30 दिवसांच्या बाळाची झूंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

अशी घेण्यात आली खबरदारी
हा परिसर सुरुवातीपासूनच सील करण्यात आला होता. त्यामुळे तेथील ये-जा पूर्ण थांबली होत. 'डॉक्टर आपल्या दारी' उपक्रमाअंतर्गत दर आठवड्याला येथील महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. किरकोळ आजार असणार्‍यांवर त्वरित उपचार करण्यात आले.

फूड पॅकेट ठरले महत्त्वाचे
ज्या महिलांकडे अन्न शिजवण्याची व्यवस्था नाही त्यांना अगदी तयार अन्नचे पॅकेट देण्यात आले. त्यासह किराणा आणि भाजीपाला देखील मोठ्या प्रमाणात देण्यात आला होता. सामाजिक संस्था व गणेश मंडळांच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. पोटाची काळजी मिटल्याने या महिलांनी आरोग्यविषयक खबरदारी घेण्यावर भर दिला.

आणखी वाचा - पिंपरी-चिंचवडची आकडेवारी होती धक्कादायक

रेड लाईट एरियात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. कोणी आजारी पडले तर त्वरित आम्हाला कळवा, असे आवाहन आम्ही केले आहे. आता तेथील व्यवसाय हळूहळू सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मात्र तरी देखील पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाकडून याबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येतेय.
- वर्षा तावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, शुक्रवार पेठ पोलिस चौकी

loading image
go to top