

Senior Citizen Kisan Wagh Dies After Stone Attack in Ambegaon Clash
sakal
पारगाव : दि. १७ ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोणी गावाच्या हद्दीत रॉयल हॉटेल मध्ये किसन रघुनाथ वाघ व शांताराम नामदेव गार्डी रा. चिचबाईवाडी ता. खेड हे दोघे मित्र जेवण करण्यासाठी थांबले असता संतोष ऊर्फ चंकी रमेश जाधव (वय २८ वर्ष ) रा. धामणी ता. आंबेगाव हा किसन वाघ व शांताराम गार्डी यांच्या जवळ जाऊन वाद घालून शिवीगाळ दमदाटी करून हातात आणलेला दगड किसन वाघ यांच्या डोक्यात दोनदा मारून गंभीर जखमी केले किसन वाघ यांना प्रथम मंचर येथील रुग्णालयात नंतर पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.