यावर्षी पुण्याला किती गरज आहे पाण्याची?

Water-Use
Water-Use

पुणे - महापालिकेने खडकवासला प्रकल्पातून गेल्या सहा वर्षांत दरवर्षी सरासरी १६ अब्ज घनफूट (टीएमसी) किंवा त्यापेक्षा अधिक पाणी घेतले आहे. महापालिकेच्या सध्याच्या पाणी वापरानुसार शहराला या वर्षी १८.६८ टीएमसी पाणी लागेल. हा प्रत्यक्ष पाणीवापर गृहीत धरल्यास शहराला डिसेंबरपासून १५ जुलैपर्यंत १०.८६ टीएमसी पाणी लागणार आहे. 

पुणे शहर आणि ग्रामीण भागात पिण्यासाठी आणि सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक २८ डिसेंबरला पार पडली. या समितीच्या म्हणण्यानुसार, पुणे महापालिका खडकवासला प्रकल्पातून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दररोज १ हजार ४५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी घेत आहे. म्हणजेच, वार्षिक १८.६८ टीएमसी पाणीवापर होईल. पुण्याला ११.५० टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर आहे. परंतु, महापालिकेतील समाविष्ट गावे आणि शहरालगतच्या भागांत लोकसंख्येत वाढ झाली आहे. तसेच, पाण्याची गळती मोठी होत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे.

पुणे महापालिकेच्या २०१९-२० च्या पाण्याच्या अंदाजपत्रकानुसार, एक जुलै २०१९ रोजी शहराची कायमस्वरूपी लोकसंख्या ५२ लाख ८ हजार आहे. तरती लोकसंख्या दोन लाख ६० हजार असून, शहरालगतच्या ग्रामीण भागातील दोन लाख ९२ हजारांच्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करावा लागतो. शिवाय, ४५ हजार नागरिकांना दररोज टॅंकरने पाणी द्यावे लागते.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मापदंडानुसार कायमस्वरूपी लोकसंख्येसाठी प्रतिदिन माणसी दीडशे लिटर, तरत्या लोकसंख्येसाठी ३५ लिटर, ग्रामीण भागासाठी ७० लिटर आणि टॅंकरद्वारे प्रतिमाणसी ५५ लिटर पाणी देण्यात येते. शैक्षणिक, वाणिज्यिक आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी १.३९ टीएमसी आहे. तसेच केशवनगर, शिवणे, न्यू कोपरे, कोंढवे धावडे, फुरसुंगी, वारजे, वाघोली ग्रामपंचायतींसह १८ खासगी संस्थांना सुमारे दोन टीएमसी पाणी दिले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com