दहावी परीक्षा रद्द; अकरावीचा प्रवेश कसा?

कोरोनामुळे राज्य सरकारने दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द, तर बारावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Students_College
Students_Collegeesakal
Summary

कोरोनामुळे राज्य सरकारने दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द, तर बारावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे : कोरोनामुळे राज्य सरकारने दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द, तर बारावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार, अकरावीचे प्रवेश कसे होणार, असे विविध प्रश्न यानिमित्ताने मान्यवरांनी उपस्थित केले आहेत.

''बोर्डाच्या परीक्षेसाठी दहावी-बारावीचे विद्यार्थी वर्षभरापासून अभ्यास करत आहेत. परंतु राज्य सरकारने सध्याची परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन झाले आहे, त्यामुळे सरकारच्या निर्णयाप्रमाणे या मूल्याकंनाच्या आधारे निकाल देणे शक्य होणार आहे. मात्र, बारावीच्या परीक्षा होणे आवश्यक आहे.''

- हरिश्चंद्र गायकवाड (अध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यापक महासंघ)

''दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पालक आणि मुलांच्या हिताचा आहे. बारावीच्या परीक्षा विभागनिहाय वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका संच तयार करून घ्यायला हव्यात. तसेच प्रती केंद्र शंभर मुले याप्रमाणे विद्यार्थी बसण्याची सोय करता येऊ शकते. त्यासाठी परीक्षा केंद्र वाढवायची झाल्यास जिल्हा परिषदेच्या शाळांचा उपयोग होऊ शकतो.''

- संतोष मुसळे (सहशिक्षक, प्राथमिक शाळा घाणखेडा, जि. जालना)

Students_College
थोरले बाजीराव यांचे वंशज महेंद्रसिंह पेशवे यांचे निधन

''गेली वर्षभरात विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन झालेले नाही. त्यामुळे दहावीच्या परीक्षेबाबतचा निर्णय घेताना सरकारने कोणते धोरण ठरविले आहे! त्यानंतर अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेबाबत सरकारने काय निर्णय घेतला आहे? इतर बोर्डाच्या तुलनेत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, याचा विचार सरकारने करणे आवश्यक आहे.''

- अविनाश ताकवले (प्राचार्य, पूना नाईट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ज्युनिअर कॉलेज)

'''दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय धक्का देणार आहे. संपूर्ण वर्षभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन परीक्षेची तयारी केली होती आणि अचानक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आल्याने विद्यार्थी नाराज झाले आहेत. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने राज्य सरकारला नाइलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला. त्यासाठी परीक्षा केंद्र वाढवायची झाल्यास जिल्हा परिषदेच्या शाळांचा परीक्षा केंद्र म्हणून विचार होऊ शकतो.''

- संजय सोमवंशी (मुख्याध्यापक, सुंदरबाई मराठे विद्यालय, खराडी)

Students_College
जनरल मोटर्सच्या 1419 कामगारांना ‘ले-ऑफ’

सरकारचा निर्णय घाई गडबडीचा

शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले,‘‘दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घाई-घाईत घेण्यात आला आहे. राज्य सरकारने ही परीक्षा पुढे ढकलायला हवी होती. आताच्या निर्णयानुसार अंतर्गत मूल्यांकन करण्यात येणार आहे. परंतु वर्षभर ऑनलाइन शाळा असल्यामुळे योग्यरीत्या अंतर्गत मूल्यांकन झालेले नाही. त्यामुळे परीक्षा घेणेच योग्य होते. बारावीच्या परीक्षा होणार आहेत, मग दहावीच्या परीक्षा घेण्यात तरी काय अडचण होती.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com