esakal | थोरले बाजीराव यांचे वंशज महेंद्रसिंह पेशवे यांचे निधन

बोलून बातमी शोधा

Mahendra Singh Peshwa a descendant of Thorale Bajirao passed away
थोरले बाजीराव यांचे वंशज महेंद्रसिंह पेशवे यांचे निधन
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पुणे : थोरले बाजीराव पेशवे यांचे नववे वंशज, हिंदवी स्वराज्य महासंघाचे कार्याध्यक्ष महेंद्रसिंह पेशवे (वय ५७) यांचे मंगळवारी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

महेंद्रसिंह हे अभियंता होते. त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. ते हिऱ्याचे तसेच मौल्यवान खड्यांचे पारखी होते. याबाबत ते सराफा व्यावसायिक तसेच अभ्यासकांना प्रशिक्षणही द्यायचे. वाराणसीच्या अन्नपूर्णा ट्रस्टचे ते विश्वस्त होते. तसेच रायगड स्मारक मंडळ, इतिहासप्रेमी मंडळासह विविध संस्थांवर ते कार्यरत होते.

हेही वाचा: रेशनवर धान्य घ्या मोफत; जिल्ह्यातील ३७ लाख नागरिकांना मिळणार मोफत धान्य

विविध ऐतिहासिक व्याख्यानांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. दरवर्षी शौर्य दिनाला ते पानिपतला अभिवादनासाठी जात असत. टेनिस हा त्यांचा आवडता खेळ होता. सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा.