वेळेच्या बंधनाने बाजारात आलेला शेतमाल विकायचा कसा; माल राहतो शिल्लक

पालेभाज्या व फळभाज्या हा नाशवंत माल आहे. तर फळे, भुसार मालाची खरेदीत ही मोठी घट झाली आहे.
Agriculture Goods
Agriculture GoodsSakal

मार्केट यार्ड - दुपारी चारपर्यंतच्या वेळेच्या मर्यादेमुळे मार्केट यार्डातील (Market Yard) घाऊक आणि किरकोळ बाजारातील खरेदी ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. एकीकडे सरकार शेतीविषयक कामांना परवानगी देत आहे, तर दुसरीकडे बाजारात आलेला माल (Agriculture Goods) विकण्यासाठी वेळेची मर्यादा घातली आहे. त्यामुळे बाजारात आलेला माल विकायचा कसा, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. (How to Sell a Commodity Market Time Constraints Balance Goods Remains)

पालेभाज्या व फळभाज्या हा नाशवंत माल आहे. तर फळे, भुसार मालाची खरेदीत ही मोठी घट झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारातून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करून करायचे तरी काय, असा प्रश्न किरकोळ विक्रेते करीत आहेत. वेळेत खरेदीसाठी कसरत करावी लागत आहे. ग्राहकांअभावी विक्रेत्यांनी मालाची खरेदी कमी केली आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील बाजारात मोठ्या प्रमाणात माल शिल्लक रहात आहे. परिणामी दर घटले आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

Agriculture Goods
अखेर २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश; अधिसूचना जाहीर

विक्रीसाठी वेळ वाढवून मिळावा : घुले

फळभाज्या व पालेभाज्यांची बाजारात आवक वाढली आहे. शेतकऱ्यांना माल वाहतुक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, किरकोळ बाजारात भाजी विकण्यास दुपारी चारपर्यंतच परवानगी देण्यात आलेली आहे. भाजीपाल्याची विक्री विशेषतः सायंकाळी जास्त प्रमाणात होत असते. त्यामुळे किमान भाजीपाला विकण्यास सायंकाळी सातपर्यंत परवानगी दिली पाहिजे. घाऊक बाजारातून भाजीपाला खरेदी करून चारच्या आत विकणे किरकोळ विक्रेत्यांना अवघड जात आहे. त्यामुळे ते कमी प्रमाणात माल खरेदी करत आहेत. त्यामुळे मार्केट यार्डातील मालाची विक्री कमी झाली आहे, असे मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी सांगितले.

भुसार विभागात ग्राहकांची प्रतीक्षा : लोढा

व्यापाऱ्यांवर ग्राहकांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. वेळेच्या मर्यादेमुळे खरेदी-विक्रीचे गणित कोलमडले आहे. वेळेच्या मर्यादा घालण्यात आल्याने भुसार विभागातील व्यापाराला फटका बसला आहे. सायंकाळी पाचनंतर संचारबंदी लागू आहे. त्यामुळे या विभागातील खरेदीला येणा‍ऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याचा फटका व्यापाराला बसला आहे, असे दि पुना मर्चंट्‌स चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी सांगितले.

Agriculture Goods
बाणेरमध्ये अनधिकृत पत्राशेडवर पुन्हा कारवाई

किरकोळ बाजारात फुलांची विक्री करणाऱ्यांनाही वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे फूल विक्रेते अधिकच्या फुलांची खरेदी करीत नाहीत. फुलांना मागणी वाढत नसल्याने दर टिकून आहेत. कोरोनामुळे शहरातील, तसेच परिसरातील मंदिरे बंद आहेत. त्यातच पावसामुळे विविध प्रकारची फुले भिजली आहेत. त्यामुळे फुलांना होणारी मागणी इतर वेळीच्या तुलनेत केवळ पन्नास टक्केच आहे.

- अरुण वीर, अध्यक्ष, फूल बाजार अडते असोसिएशन

विशेषतः किरकोळ बाजारात सायंकाळी पाचनंतर ग्राहक फळांची खरेदी करीत असतात. मात्र, आता चार वाजताच व्यवहार बंद होत असल्याने खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी वेळ कमी पडत आहे. त्यामुळे फळांना उठाव नाही. फळ विभागात अनेक प्रकारचे फळे विक्रीसाठी येत असतात. नेहमीच फळांना चांगली मागणी असते. त्यामुळे खूप कमी वेळा माल शिल्लक राहतो. मात्र, व्यवहाराच्या वेळा कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खरेदीदारांची संख्याही कमी झाली आहे.

- अरविंद मोरे, फळांचे व्यापारी, मार्केट यार्ड

वेळेअभावी नेहमीप्रमाणे ग्राहकांकडून भाज्यांची खरेदी केली जात नाही. मार्केट यार्डातून माल खरेदी करून विक्रीच्या ठिकाणी पोचेपर्यंत दुकान बंद करण्याची वेळ होत आहे. किरकोळ बाजारात सायंकाळनंतर ग्राहकांची संख्या वाढत असते. लोक कार्यालयातून घरी जाताना भाज्यांची खरेदी करीत असतात. मात्र, आता कार्यालये आणि व्यवहारावर वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे विविध भाज्यांना ग्राहकांकडून मागणी कमी झाली आहे.

- प्रकाश ढमढेरे, भाज्यांचे किरकोळ विक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com