हेरिटेज वॉकमधून अनुभवले मावळचे सौंदर्य

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 November 2019

मावळातील ऐतिहासिक सौंदर्य न्याहाळता यावे, यासाठी यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया या जागतिक पर्यटन संस्थेच्या मालाड शाखेने मावळ तालुक्‍यात हेरिटेज वॉक केला. सुरत, राजकोट, अहमदाबाद, नाशिक, गोवा आणि मुंबईतील ५१ सदस्य या वॉकमध्ये सहभागी झाले होते. या वॉकच्या माध्यमातून पर्यटकांनी मावळच्या ग्रामीण जीवनाचा अनुभव घेतला.

सुरत, राजकोट, अहमदाबाद, नाशिक, गोवा, मुंबई येथील पर्यटकांचा सहभाग
टाकवे बुद्रुक - मावळातील ऐतिहासिक सौंदर्य न्याहाळता यावे, यासाठी यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया या जागतिक पर्यटन संस्थेच्या मालाड शाखेने मावळ तालुक्‍यात हेरिटेज वॉक केला. सुरत, राजकोट, अहमदाबाद, नाशिक, गोवा आणि मुंबईतील ५१ सदस्य या वॉकमध्ये सहभागी झाले होते. या वॉकच्या माध्यमातून पर्यटकांनी मावळच्या ग्रामीण जीवनाचा अनुभव घेतला. 

सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि निसर्गसौंदर्याची पर्यटकांना भुरळ पडली आहे. पावसाळ्यात वर्षाविहिराला आणि हिवाळ्यात हेरिटेज वॉकला पुणे, मुंबईतील पर्यटक येऊ लागले आहेत. मुंबईतून निघालेल्या सदस्यांनी कर्जत येथील कोंढाणे लेणीपासून हा वॉक सुरू झाला. राजमाची किल्ला, शिरोता धरण, श्रीक्षेत्र कोंडेश्वराचे प्राचीन शिवमंदिर, कुसूरचा घाटमाथा, दऱ्याखोऱ्या पाहत भिवपुरी असा हा वॉक झाला. कुसूरजवळील चिरेखानीत या सदस्यांनी मुक्काम केला.

दोन दिवसांच्या वॉकमध्ये त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. आदिवासी पाड्यात आरोग्य तपासणी केली. सकाळची थंड हवा आणि धुक्‍याची धुलई, दुपारी रणरणते ऊन आणि रात्री चांदण्याचा अनुभव या मंडळींनी घेतला. लेणी, किल्ला, तलाव, मंदिर, घाटमाथा, डोंगर, दऱ्या अशी विविधता या वॉकमध्ये अनुभवता आल्याचे युथ होस्टेलच्या सदस्यांनी सांगितले. गौरव प्रभू, शेखर धुमाळ, विश्वास सावंत, प्रमोद शिर्के, प्रकाश तिर्लटोकर यांच्या अन्य सदस्यांनी हा निसर्ग अनुभवला. गौरव प्रभू म्हणाले, ‘‘यूथ होस्टेल ही जागतिक पर्यटन जनजागृती करणारी जागतिक संस्था असून, महाराष्ट्रात अशा चाळीस संस्था आहे. मालाड शाखेत ७५० सदस्य असून, सह्याद्रीच्या डोंगरात वॉकचा हा ३२ वा उपक्रम आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hritage walk maval nature