esakal | पुणे : बारावी निकालाचा टक्का यंदा वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

बारावी निकाल पुणे

पुणे : बारावी निकालाचा टक्का यंदा वाढला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमधील बारावी (HSC) उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. बहुतांश महाविद्यालयांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त असून १०० टक्के निकाल असणाऱ्या महाविद्यालयांची संख्याही अधिक आहे. (Hsc result percentage increased this year)

फर्ग्युसन महाविद्यालयातील कला आणि विज्ञान शाखेतून बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत जानवी जैन (९७ टक्के), सृहृद पटवर्धन आणि शौनक करमरकर (९५.६७ टक्के) यांनी अनुक्रम प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. कला शाखेत अक्षता गायकवारी (९८.१७ टक्के) आणि आंचल पाटणकर (९८ टक्के) हे अनुक्रम प्रथम व द्वितीय आले आहेत.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये प्रसंगी कडक लॉकडाउन

‘बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स’मधील (बीएमसीसी) बारावीचे ९९.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयात जील जिंजूवाडिया (९९ टक्के), निकुंज चौधरी, श्रावणी अगले, वैष्णवी गजरे (९८.८३ टक्के) यांनी अव्वल स्थान पटकाविले.

अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील बारावीचे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेत सानिका भोईटे (९१ टक्के), प्रांजली पंधे (८८), आकाश कारभारी आणि पद्मा चव्हाण (८६ टक्के) यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविले. विज्ञान शाखेत तेजस जामदार, सुजित कुलाल, सोनाली सहानी ९३ टक्के गुण मिळविले.

ऑनलाइन शिक्षण होऊनही बारावीच्या परीक्षेसाठी वर्षभर तयारी केली होती. जवळपास ९५ टक्क्यांपेक्षा अधिक टक्के मिळणे अपेक्षित होते. आता सनदी लेखापाल (सीए) व्हायचे असून त्याच्या परीक्षेची तयारी सध्या सुरू आहे.

- जील जिंजूवाडिया (९९ टक्के, बीएमसीसी)

loading image
go to top