Pune Traffic : एचएसआरपी लावण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; वाहनधारकांचा प्रतिसाद कमी
HSRP Number Plate : राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी लावण्यासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून, त्यानंतर कारवाई व ₹१००० दंड आकारला जाणार आहे.
पुणे : राज्य परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) लावण्यासाठी १५ ऑगस्टची मुदत दिली होती. मात्र, वाहनधारकांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्यामुळे आता चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत नंबरप्लेट लावता येणार आहे.