Pune Weather News: चार दिवसांच्या संततधारेनंतर पुणेकरांना दिलासा; शहरात पावसाची विश्रांती, घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट'

Pune city rain update July 2026 चार दिवसांच्या पावसानंतर पुणे हवामान अपडेट
Pune Weather Update: City Sees Break from Rain as Ghat Areas Remain on Red Alert

Pune Weather Update: City Sees Break from Rain as Ghat Areas Remain on Red Alert

sakal

Updated on

पुणे : गेल्या चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या संततधार पावसानंतर शनिवारी (ता. २५) पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. शहरातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, काही ठिकाणी केवळ हलक्या सरी बरसल्या. दिवसभर ढगाळ वातावरण असूनही अधूनमधून ऊन पडल्याने वातावरणात बदल जाणवला. मात्र, शहरात उघडीप असली, तरी घाटमाथा परिसरात पावसाचा जोर कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com