Fish
sakal
मंचर - आषाढ महिन्याच्या शेवटच्या बुधवारी आखाड पार्टी करण्याची परंपरा असल्याने आंबेगाव तालुक्यात चिकन, मटण, गावरान कोंबड्या आणि मासळी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक, पेठ, रांजणी, एकलहरे, कळंब, निरगुडसर, डिंभे, शिनोली आदी प्रमुख गावांतील मांसविक्री केंद्रे आणि हॉटेलमध्ये दिवसभर गर्दी दिसून आली. पाऊस समाधानकारक झाल्याने यंदा मांसाहारी पदार्थांना खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.