esakal | कृतिकाचे आई-वडील आता फोन उचलणार नाहीत, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

pune

रेश्मा आणि कैलास चव्हाण असे तिच्या आई वडिलांचे नाव. त्या दोघांच्या मृत्यू झाला आहे. ते कोंढवे धावडे येथील लक्ष्मी स्पर्श या सोसायटीत राहत होते. चव्‍हाण यांचे शिवणे उत्तरनगरला चष्म्याचे दुकान होते. पत्नी रेश्मा रुग्णालयात लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत होत्या. उत्साही जोडपे म्हणून या परिसरातल्या सोसायटीत प्रसिद्ध होते.

कृतिकाचे आई-वडील आता फोन उचलणार नाहीत, कारण...

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

पुणे : सहा सात वर्षाची कृतिका आज दुपारी शाळेतून घरी आली. घर बंद असल्याने ती घरासमोरील धनंजय म्हसकर आजोबांच्या घरी गेली अन तेथून म्हसकर त्यांच्या मोबाईलवरून तिने तिच्या आई वडिलांना फोन केला. दोघांच्या फोनची रिंग वाजत होती. अनेकवेळा फोन उचलत नव्हते. अखेर म्हसकर आजीने तिला जेवायला दिले आणि त्यांच्याच घराची झोपी गेली होती. आता कृतिकाचे आई वडील फोन उचलणार नाहीत कारण तिचे आई- वडील दोघाचा खडकवासला येथे कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे.

रेश्मा आणि कैलास चव्हाण असे तिच्या आई वडिलांचे नाव. त्या दोघांच्या मृत्यू झाला आहे. ते कोंढवे धावडे येथील लक्ष्मी स्पर्श या सोसायटीत राहत होते. चव्‍हाण यांचे शिवणे उत्तरनगरला चष्म्याचे दुकान होते. पत्नी रेश्मा रुग्णालयात लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत होत्या. उत्साही जोडपे म्हणून या परिसरातल्या सोसायटीत प्रसिद्ध होते.

त्या महिला मुलांना भजन व हार्मोनियम शिकवीत होत्या. स्वरमनिका अकॅडमी चालवत होत्या. सोसायटीतील महेश बारटक्केना दुपारी दुसरे रहिवाशी गोविंद गडदेंचा फोन आला की, या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यानंतर सोसायटीत घटना कळली. त्यांच्याकडे भजनाला जाणाऱ्या महिला अन सोसायटी गहिवरली. म्हसकर आजींचा कंठ दाटून आला अन कृतिका समोर दिसत होती. येथे कैलास पत्नी मुलगी त्यांचा भाऊ मंदार आई अल्का व बहिण यांच्या समवेत राहत होते. 

कैलास यांनी नुकताच पोहोण्याचा क्लास लावला होता. ते पोहण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी कालव्यात जाणार होते. त्याच्या आईने त्याला पोचण्यास जाऊ नको असे सांगितले होते. तरी देखील ते गुपचूप पोचण्यास गेले होते. त्यानंतर पत्नी रेश्मा या मुलगी कृतिकाला घेऊन खडकवासला येथील शाळेत सोडण्यास गेले होत्या. मुलीला शाळेत सोडल्यानंतर ते दोघे धरणाच्या कालवा येथे आले. तेथे त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. कोंढवे धावडे येथील स्मशानभूमीत मंगळवारी संध्याकाळी कैलास आणि रेश्मा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

loading image